महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट ।। राज्यभरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अन पावसाचा खेळ सुरू आहे . बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप आहे . तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . पुढील 4 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचे इशारे देण्यात आले आहेत . मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता असून तळ कोकण व दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर हळूहळू वाढणार आहे . (IMD Forecast)
हवामान विभागाचा अंदाज काय ?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चक्राकार वारे तयार होत असून पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे . मध्य महाराष्ट्र वगळता पुढील काही दिवसात उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता आहे . मराठवाड्यात सर्वदूर पावसाची हजेरी राहणार आहे .
कुठे कोणता अलर्ट ?
2 ऑगस्ट : वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट
3 ऑगस्ट : वर्धा, नागपूर, भंडारा ,गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर यलो अलर्ट, तळ कोकणासह कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड जिल्हा हलक्या पावसाची शक्यता
4 ऑगस्ट : सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली पावसाचा येलो अलर्ट तळ कोकणासह ,पुणे ,सातारा व कोल्हापुरात हलक्या पावसाची शक्यता
5 ऑगस्ट : लातूर, धाराशिव, सोलापूर, वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्हा – यलो अलर्ट
6 ऑगस्ट : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पावसाचे येलो अलर्टv
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही भागांमध्ये स्थानिक हवामानामुळे हलक्या सरी पडू शकतात.
पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम असून, हवामान खात्याने नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मुसळधार सरी आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.