महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. सरकारने नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी एक योजना राबवली आहे. या योजनेत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. यासाठी आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. दरम्यान, आता या योजनेअंतर्गत नागरिकांना गोल्डन कार्ड मिळणार आहे. हे गोल्डन कार्ड नक्की आहे तरी काय ते जाणून घ्या. (Ayushman Bharat Card)
‘एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (एबी-पीएमजेएवाय) आणि ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने’चा लाभ मिळवण्यासाठी हे कार्ड गरजेचे आहे. या योजनेत गोल्डन कार्ड बनवण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत विशेष मोहिम राबवण्यात आली आहे. नागरिकांना कार्ड तयार करण्याचे आवाहन केले आहे.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. यासाठी काही रुग्णालये निश्चित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत १ हजार ३६५ प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे. या योजनेत ७० वर्षांवरील जास्त वयोगटातील नागरिकांना आयुष्मान भारत वंद कार्डच्या माध्यमातून लाभ घेतला जातो.
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आयुष्यमान गोल्डन कार्ड असणे बंधनकारक आहे. हे कार्ज आर्थिकदृष्ट्या दुर्बल वयोगटातील नागरिकांना मिळते. (Ayushman Bharat Golden Card)
आयुष्मान गोल्डन कार्ड कसं बनवायचं? (How To Make Ayushman Golden Card)
यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे. तुम्हाला सर्वात आधी आयुष्मान अॅप डाउनलोड करायचा आहे. किंवा https://beneficiary.nha.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला आयुष्मान गोल्डन कार्ड मिळेल. ३० ऑगस्टपर्यंत हे कार्ड बनवण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
