महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १४ ऑक्टोबर | म्हाडाप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच CIDCO काम करते. नवी मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना हक्काचं घर मिळावं, यासाठी सिडकोकडून घरं उपलब्ध करून दिली जातात. यंदाच्या दिवाळीत सिडकोतर्फे नवी मुंबईतील तब्बल २२०० घरांची लॉटरी काढण्यात येणार होती. या घरांची किंमत न परवडणारी असल्याने त्याची किंमत कमी करण्याची मागणी होत होती. मात्र आता दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदाची दिवाळीत नवी मुंबईकरांसाठी सिडको कडून २२००० घरांची लॉटरी काढण्यात येणार होती. या घरांची किंमत नागरिकांना परवडणारी नसल्याने या घरांची किंमत कमी करण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सिडकोच्या घरांच्या किंमती करण्यासंदर्भामध्ये बैठक आयोजित करणार होते.
शिवाय मुख्यमंत्री नवी मुंबईमध्ये आल्यानंतर पंधरा दिवसात सिडकोच्या घरांच्या किमती करण्यासंदर्भामध्ये बैठक लावू असे आश्वासन माथाडी कामगारांना देण्यात आलं होतं. मात्र सिडकोच्या घराच्या किमती करण्यासंदर्भामध्ये सिडको आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडली आहे.
सिडकोच्या अपूर्ण निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शिवाय दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडल्याने नागरिकांचे स्वप्न भंग झालं असंच म्हणायला हवं. दरम्यान आता सिडको कधी लॉटरी काढणार ? आणि घरांच्या किमती कमी होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.