Horoscope Today दि. २१ मे २०२६ ; आज वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. .………… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ मे २०२६ ।।

मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope)
मानसिक चंचलता जाणवेल. विचारांच्या गर्दीत वाहून जाऊ नका. भावंडांची मदत घेता येईल. जवळच्या ठिकाणी फेरफटका मारून यावा. आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
तुमच्यातील खळखळता उत्साह जागृत ठेवावा. कामाचा ताण जाणवेल. वेळेचे नियोजन केल्यास बर्‍याच गोष्टी जमून येतील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
आपल्याचा शब्दावर ठाम राहाल. दिवस मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. क्षणिक गोष्टींनी खुश व्हाल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.

कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
मागील गोष्टींची पुनरावृत्ती टाळावी. जोडीदाराच्या वागण्याचे आश्चर्य वाटू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. भावनेच्या अति आहारी जाऊ नका. वैचारिक गोंधळ उडू शकतो.

सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope)
नोकरदारांचा मान वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. जवळच्या लोकांची गाठ पडेल. लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
दिवसभर कामाची गडबड राहील. आपली मनस्थिती गोंधळलेली राहू शकते. कामाचे व्यवस्थित मूल्यमापन करावे. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नये. इतरांना स्वखुशीने मदत कराल.

तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope)
चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. फक्त आपल्याच कामाशी मतलब ठेवून वागावे. कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
आपण स्वत:च आपल्या त्रासाला कारणीभूत ठरू शकाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. भावंडांना मदत करता येईल. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक करतांना संपूर्ण विचार करावा.

धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करतांना घाई करू नका. प्रवासात खबरदारी घ्यावी.

मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
प्रेमातील जवळीक जोपासावी. मुलांशी किरकोळ कारणावरून वाद संभवतात. स्वत:च्या करमणुकीचा मार्ग शोधावा. जुन्या गोष्टींमध्ये फार काळ रेंगाळू नका. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावा.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
मुलांच्या चंचलतेकडे बारीक लक्ष ठेवावे. आततायीपणे कोणतेही काम करू नये. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण वाढू शकतो.

मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope )
घरगुती कामात अधिक वेळ जाईल. मित्रमंडळींमध्ये खोडकरपणा कराल. दिवस मजेत घालवाल. हातातील अधिकाराचा वापर करावा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *