महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 21 मे २०२६ ।। पेट्रोल पंपावर अजून E30 आलेलं नाही, पण सरकारच्या नव्या निर्णयाने देशभरातील वाहनधारकांच्या कपाळावर आठ्या उमटायला सुरुवात झाली आहे. आजवर E20 चा गजर सुरू असताना आता थेट E22, E27 आणि E30 या नव्या इंधन मानकांची घोषणा झाली आणि मोटारविश्वात कुजबुज वाढली. “आज E20, उद्या E30… मग आपल्या गाडीचं काय?” हा प्रश्न आता प्रत्येक मध्यमवर्गीय चालकाच्या मनात धुरासारखा फिरू लागला आहे. सरकार म्हणतं, परदेशातून येणारं महागडं कच्चं तेल कमी करायचं, देशात तयार होणाऱ्या Ethanol ला चालना द्यायची आणि पर्यावरणालाही थोडा दिलासा द्यायचा. ऐकायला सगळं अगदी राष्ट्रहिताचं! पण या निर्णयाच्या रस्त्यावर सर्वसामान्य वाहनचालकाचा खिसा पुन्हा एकदा टोल नाक्यावर उभा राहणार का, याचीच खरी चिंता आहे.
भारतीय मानक ब्युरोने E22, E27 आणि E30 या नव्या Fuel Standards ला मंजुरी दिली आणि सरकारच्या इंधनधोरणाचा वेग आता स्पष्ट दिसू लागला. भारत अजूनही तब्बल 85 टक्क्यांहून अधिक कच्चं तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाचे दर चढले की आपल्या देशातील पेट्रोल पंपावर लगेच आग लागते. त्यावर उपाय म्हणून ऊस, मका यांसारख्या पिकांपासून तयार होणारं Ethanol सरकारला रामबाण औषध वाटू लागलं आहे. पण या औषधाचे दुष्परिणाम कोण भोगणार? कारण भारतातील लाखो जुन्या पेट्रोल गाड्या अजूनही E30 साठी तयार नाहीत. इंजिनमधील Fuel Lines, Rubber Parts, Injectors आणि Engine Tuning वर या इंधनाचा परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. म्हणजेच सरकारच्या “ग्रीन” स्वप्नासाठी सामान्य माणसाला पुन्हा गॅरेजचा रस्ता धरावा लागू शकतो.
यात भर म्हणजे Mileage चा मुद्दा. Ethanol मध्ये सामान्य पेट्रोलपेक्षा ऊर्जा कमी असल्याने जास्त Ethanol मिश्रण असलेल्या इंधनामुळे गाडीचं मायलेज कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे आधीच महाग पेट्रोल आणि त्यात कमी धावणारी गाडी! वाहन कंपन्यांनाही इंजिनचं Recalibration करावं लागू शकतं. त्यामुळे भविष्यात Flex-Fuel Vehicles चा जमाना येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. काही कंपन्यांनी अशा गाड्यांचे Prototype दाखवले असले तरी त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तोपर्यंत मात्र भारतीय वाहनचालकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी — सरकारचं इंधनधोरण बदलतंय, पण आपल्या खिशावरचा ताण मात्र अजूनही कायम आहे!
India takes another step towards cleaner mobility 🇮🇳
Bureau of Indian Standards has notified fuel standards for E22, E25, E27 & E30 fuels, enabling higher blending of anhydrous ethanol with petrol for positive ignition engine vehicles.
The BIS notification lays down technical… pic.twitter.com/yKw0zSA5rB
— DD News (@DDNewslive) May 19, 2026
