![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जून २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. नवीन ओळखी होतील. चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
दिवस आनंदात जाईल. नवीन कामात हात घालाल. केलेल्या कामातून समाधान मिळेल. सहकार्यांकडून कौतुक केले जाईल. कामे योग्य वेळेत पूर्ण करता येतील.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
करमणुकीत अधिक वेळ घालवाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. संभाषणाची आवड जोपासली जाईल. बुद्धी चातुर्यावर खुश राहाल.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. कामाचा यथायोग्य आनंद मिळेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट द्याल.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
प्रवास हसत-खेळत पार पडेल. जवळचे मित्र भेटतील. दिवस आनंदात जाईल. अधिकार्यांशी सल्लामसलत कराल. तरुण वर्गाशी मैत्री कराल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सर्व गोष्टींचा सारासार विचार कराल. काही कामांचे मनन कराल. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. कमिशन मधून चांगला धनलाभ होईल.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
मनात चलबिचलता जाणवेल. ठाम निर्णय घ्यावे लागू शकतात. धार्मिक कामात मन गुंतवावे. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. नवीन संधी उपलब्ध होतील.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
पारमार्थिक कामात मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. अनाठायी खर्च होण्याची शक्यता.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
कामातील अडचणी दूर होतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. स्वत:वरील खर्च वाढू शकतो. घरात काही बदल करावे लागू शकतात. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
शब्दांची धार थोडी कमी करावी लागेल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गरज नसताना वस्तु खरेदी केल्या जातील. टापटिपेवर अधिक वेळ घालवाल. स्वभावात काहीसा उधळेपणा येईल.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
शेअर्स मधून धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून कमाई सुधारेल. अडचणींवर मात करता येईल. पित्त विकाराचा त्रास संभवतो. किरकोळ जखमांपासून काळजी घ्यावी लागेल.