‘आयटीआय’ शिक्षकांचे पगारासाठी राज ठाकरेंना साकडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ४ नोव्हेंबर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे लॉकडाऊननंतर अनेक संघटना आणि नागरिकांनी प्रश्न मांडले आहेत. वाहन चालक संघटना, मुंबईचे डबेवाले, विद्यार्थी संघटना यांसह अनेकांनी राज ठाकरेंपुढे आपलं गा-हाण मांडल्याचं आपण पाहिलं. आता, आयटीआय शिक्षक संघटनाही राजदरबारी पोहोचल्या आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (कळक) शिक्षकांचं राज्य सरकारकडून गेले ८ महिने थकलेलं वेतन व इतर समस्यांबद्दल ‘महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. तासिका शिक्षक संघर्ष समिती’च्या प्रतिनिधींनी कुष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. आपल्यावरील अन्यायाचा आणि वेतन नसल्यामुळे होत असलेल्या आर्थिक चणचणीचा पाढाच या पदाधिका-यांना राजदरबारी मांडला. आता, राज ठाकरेंकडूनच अपेक्षा असल्याचंही संघटनेचे पदाधिकारी म्हणाले. त्यामुळे, आता मनसेकडून सरकारला या शिक्षकांच्या पगारीसाठी धारेवर धरले जाईल का, हेच पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *