‘जगात भारी’ डिसले गुरुजींचे ‘कृष्ण कुंज’वर कौतुक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १० डिसेंबर – सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याचदरम्यान रणजितसिंह डिसले यांनी आज कुटुंबियांसमवेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरे आणि रणजीतसिंह डिसले यांची शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाली.

रणजीतसिंह डिसले यांनी बक्षिसरुपात मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केलं. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या ह्या दातृत्वामुळे ख-या अर्थाने महाराष्ट्राची मान उंचावली आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच या भेटीनंतर रणजीतसिंह डिसले यांनी राज ठाकरेंची शिक्षण क्षेत्र संबंधात असणारी प्रचंड आवड खूप चांगली वाटली. तसेच महाराष्ट्र राज्याच नाव शिक्षणक्षेत्रात अधिक उंचावेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असं रणजीतसिंह डिसले यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *