महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२१। नवीदिल्ली । पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशभरात नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील इंधन दरवाढ हा एक गंभीर मुद्दा आहे ज्यामध्ये किंमत कमी करण्याक्यतिरिक्त कोणतेच उत्तर देणे योग्य नाही. केंद्र आणि राज्य सरकारने ग्राहकांना योग्य दरात इंधन उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे म्हटले आहे.
पेट्रोल आणि डिझेल दरवाढ केंद्र सरकारसाठी अडचणीचा मुद्दा ठरत आहे. चेन्नई सिटिजन फोरमने आयोजित केलेल्या चर्चासत्रात अर्थमंत्री सीतारामन यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यादेखील इंधन दरवाढीवरून हैराण, परेशान असल्याचे दिसून आले. तेलाच्या किमतींवर सरकारचे नियंत्रण नाही. ते तांत्रिकदृष्टय़ा मुक्त करण्यात आले आहे. तेल कंपन्या कच्चे तेल आयात करतात, रिफाइन करतात आणि विकतात. त्यामुळे त्याचे दर कमी करणे एक धर्मसंकट असल्याचे त्या म्हणाल्या. पेट्रोल-डिझेल दरवाढीने केंद्र सरकारविरोधात संतापाची भावना आहे, अशी स्पष्ट कबुलीही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.