प्राचार्य रणजीत पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा…
प्रशासनाशी चर्चा करून दोन-तीन दिवसांत निश्चित तोडगा काढण्याचे दिले आश्वासन
मागण्या मान्य न झाल्या तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र 24 । पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी ।
कोव्हीड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र विद्यार्थ्यांकडून जबरदस्ती फीसाठी तगादा लावला जात आहे. परिणामी पालकवर्गांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमिवर पालक सध्या विविध समस्यांना तोंड देत आहेत. त्यात महाविद्यालयांकडून केली जाणारी सक्ती अयोग्य आहे. याविरोधात छावा स्वराज्य सेनेकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य रणजीत पाटील यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे. सोमवार, दिनांक 1 मार्च रोजी डी. वाय पाटील महाविद्यालय प्रशासनाला याचा जाब विचारण्यासाठी छावा स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी डीवाय पाटील प्रशासनाची भेट घेऊन त्यांना फी वसुलीसंदर्भात निवेदन दिले. प्राचार्य रणजीत पाटील व डि. वाय पाटील महाविद्यालयाचे कायदेविषय सल्लागार अॅड. संदीप राणे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी दोन-तीन दिवसांत महाविद्यालय प्रशासनाची चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन छावा स्वराज्य सेनेला दिल्याची माहिती पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सौरभ सगर यांनी लाईव्ह महाराष्ट्र 24 ला दिली.
छावा स्वराज्य सेनेच्या प्रमुख मागण्या अशा…
1) पूर्ण फीज भरा अन्यथा विद्यार्थांना विद्यापीठ परीक्षा अर्ज भरता येणार नाही. या प्रशासनाच्या अडमूठ धोरणाला आमचा विरोध आहे. व प्रत्येक विद्यार्थ्याला यामध्ये सवलत मिळावी. व कोणत्याची विद्यार्थ्याची अर्ज भरतेवेळी अडवणूक होऊ नये.
2) लॅबोरेटरजीज फी, विद्यापीठ विकसित फी, तसेच विद्यार्थी अॅक्टिव्हिटी शुल्क व जे काही अन्य शुल्क संपूर्ण वर्षभरासाठी आकारले गेले आहे. यामध्ये पूर्णतः फी माफ करण्यात यावी.
वर्षभरात दोन वेळा पुणे विद्यापीठ टर्म फी आकरण्यात येत आहे. महाविद्यालये बंद असताना ही फी कशासाठी?
विद्यार्थ्यांना एकूण फीमधील 50 टक्के सवलत देण्यात यावी. ही आमची प्रमुख मागणी आहे.
यावर महाविद्यालयाचे प्राचार्य रणजीत पाटीलसर यांनी चर्चेदरम्यान, आमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मकता दाखविली आहे. तसेच पुणे विद्यापीठाला आमचे प्रमुख मागण्यांचे निवेदन महाविद्यालय प्रशासन पाठविणार आहे. व डी. वाय. पाटील प्रशासनासोबत योग्य चर्चा करून प्रशासन यावर विचार करून तीन ते चार दिवसांत योग्य तोडगा काढणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे.
प्रशासनाने जर फी माफ केली नाही तर आम्ही निश्चितच आंदोलनाचा पवित्रा घेऊ आणि डी. वाय पाटील प्रशासनाला धारेवर धरू. या मतावर आम्ही ठाम असल्याचे परखड मत छावा स्वराज्य सेनेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केले.
यावेळी या पदाधिकाऱ्यांची होती प्रामुख्याने उपस्थिती…
यावेळी छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक पाटील, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ, महिला प्रदेशाध्यक्ष शीतलताई हुलावळे, प्रदेश संघटक विवेक अत्रे, पिंपरी विधानसभा युवा सेना अध्यक्ष अभिजित गोफण, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सौरभ सगर, युवा अध्यक्ष पिं. चिं. शहर अनिकेत बेळगावकर, पुणे महिला शहराध्यक्षा मेघा कदम, विद्यार्थी अध्यक्ष पिं. चिं शहर प्रतिक अलिबागकर, व्यापारी अध्यक्ष पिं. चिं. शहर सुशांत जाधव, उपाध्यक्ष पिं. चिं. विजय माने, पिं. चिं. संपर्कप्रमुख शेखर हुंशाळ, अतुल चव्हाण, इजाज शेख, सुरज राऊत, अंगद जाधव, निशांत जाधव, किशोर अट्टारगेकर, मीना ठुले, पूजा कांबळे, सौरभ मालवदकर, समर्थ नरळकर, प्रथमेश गायकवाड, प्रतिक पडवळ, नितेश जाधव, संकेत साळुंखे, ऋषिकेश शिंदे, संतोष कोळी, अभिषेक वैद्य, दीपक गंजाले, भुणेश खासबाग. आदी पदाधिकारी उपस्थित होते.