वार्षिक वस्तू व सेवाकर (जीएसटी) भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – नवीदिल्ली – निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदिल मिळताच केंद्र सरकारकडून आर्थिक वर्ष २०१९-२० साठी वार्षिक वस्तू व सेवाकर (जीएसटी) भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जीएसटीआर-९, जीएसटीआर-९ सी वार्षिक परतावा भरण्यासाठी सीजीएसटी कायद्याच्या ४४ कलमाअन्वये सीजीएसटी अधिनियम ८० नुसार आर्थिक वर्ष २०१९-२० यासाठी परतावा भरण्याच्या तारखेत यापूर्वी देखील मुदतवाढ देण्यात आली होती. याअगोदर परतावा भरण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत होती. पंरतु, त्यात मुदतवाढ देवून २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आली होती. करदात्यांनी या मुदतीपर्यंत परतावा भरण्यासाठी असमर्थता दर्शविली होती.

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या अनुषंगाने मुदतवाढीकरीता सरकारकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली होती. आयोगाकडून मुदत वाढीची परवानगी मिळताच आर्थिक वर्ष २०१९-२० यासाठी जीएसटीआर-९, जीएसटीआर-९ सी भरण्याची तारीख ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी जीएसटी परतावा भरावा असे आवाहन अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. निर्णय परिणामकारक रितीने जारी करण्यासाठी लवकरच अधिसूचना काढली जाईल असेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *