महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – अहमदाबाद – भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पिचवरून वाद अद्याप सुरूच आहे. डे-नाइट कसोटीची लढत दुसऱ्या दिवशीच संपली होती. भारताने १० विकेटनी विजय मिळून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या पिचवरून अनेकांनी आक्षेप घेतला आहे. आता इंग्लंडच्या एका माजी क्रिकेटपटूने यावर मत व्यक्त केले आहे.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉटी पनेसर याच्या मते, जर चौथ्या कसोटी सामन्यासाठी अशाच प्रकारचे पिच तयार केले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतावर कारवाई करावी. आयसीसीने भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील काही अंक कमी करावेत असे त्याने म्हटले.पिंक बॉलने झालेल्या तिसऱ्या कसोटीचा निकाल दोन दिवसात लागला होता. इंग्लंडचे फलंदाज दोन वेळा फिरकी गोलंदाजांसमोर बाद झाले. इंग्लंडचे अनेक दिग्गज खेळाडू अहमदाबादच्या पिचवर टीका करत आहेत. पनेसर प्रमाणे अनेकांनी पुढील सामन्यात देखील असेच पिच असेल तर भारतीय संघाचे WTCमधील गुण कमी करावेत असे मत व्यक्त केले आहे.
पुढील सामन्यात देखील असे झाले तर आयसीसीने भारताला दंड करावा. सर्वांना आनंद आहे की ते जगातील सर्वात मोठे मैदान आहे. पण क्युरेटरने एक चांगले विकेट तयार केले पाहिजे होते. पच फिरकीपटूंना साध देणारे हवे. चेन्नईबाबत सर्वजण टीका करत आहेत आणि अहमदाबादमध्ये तर त्यापेक्षा वाइट परिस्थिती होती.पनेसर म्हणाला, फिरकीपटूंना साथ देणारे पिच असेल तर हरकत नाही. सामना किमान ३ ते ४ दिवस झाला पाहिजे. तुम्ही तशा प्रकारची विकेट तयार करत असाल तर सामना ३ दिवस तरी चालला पाहिजे.