पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्यास मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत लिंक करता येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. १ एप्रिल । पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आज 31 मार्च शेवटची तारीख होती, पण ती तारीख आता वाढवण्यात आलीय. मोदी सरकारने पॅनशी आधार क्रमांक जोडण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 पर्यंत वाढविली. आयकर अधिनियम 1961 च्या कलम 148 अन्वये नोटीस बजावण्याची तारीख, विवाद निवारण पॅनेलने (DRP) जारी केलेल्या निर्देशासाठी निकालाचा आदेश मंजूर करणे आणि समानता आकारणी निवेदनांवर प्रक्रिया करण्यासाठीही 30 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. (Good news! Extension to add PAN card and Aadhar card, can now be linked till 30th June, 2021)

विशेष म्हणजे 31 मार्चची मुदत संपण्यापूर्वीच अधिक लोड आल्यामुळे बुधवारी इन्कम टॅक्सची वेबसाईट क्रॅश झाली होती. आर्थिक वर्ष 2020-21 आर्थिक वर्षाचा आज शेवटचा दिवस होता. तांत्रिक दबावामुळे वेबसाईट क्रॅश झाल्यानं आर्थिक कामे पूर्ण करण्यात करदात्यांना अडचणी आल्या. त्यामुळे ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या तारखेला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे लोक फार त्रस्त झाले आहेत. याबद्दल सोशल मीडियावर ते पोस्ट करत होते. सर्वात आधी बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास आयकर विभागाची साईट क्रॅश झाली, त्यानंतर ती पूर्ववत केली गेली. परंतु त्यानंतरही वेबसाईट वारंवार क्रॅश होत होती. त्यामुळे लोक सोशल मीडियावर आयकर विभागाकडे 31 मार्च रोजी होणारी अंतिम मुदत वाढविण्याची मागणी करत होते, त्यानुसारच ही मुदतवाढ देण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *