या क्षेत्रात भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध , ; करिअर बनवायचा उत्तम मार्ग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२१ एप्रिल । मुंबई । डिजिटल मार्केटिंग हा भविष्याचा उत्तम मार्ग आहे. जरी आज या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत, त्यापेक्षा जास्त संधी भविष्यात असतील. येणारा काळ इंटरनेटचा आहे आणि म्हणूनच कंपन्यांना त्यांची जाहिरात मोहीम इंटरनेटवरच पुढे न्यायची आहेत. जाणून घ्या डिजिटल मार्केटिंगविषयी 

जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये चांगले करिअर बनवायचे असेल तर डिजिटल मार्केटिंगमध्ये एमबीए केले पाहिजे. ही एमबीए पदवी सामान्य एमबीए पदवीपेक्षा थोडी वेगळी आहे. कारण, साधारण एमबीएमध्ये सर्व प्रकारच्या मार्केटिंगबद्दल शिकवले जाते परंतु डिजिटल मार्केटिंगमध्ये केवळ डिजिटल मार्केटिंगच शिकवले जाते. यात वेबसाइट्‌स, सोशल नेटवर्क्‍स, गूगल ऍड, सर्च रिझल्ट आदींविषयी शिकवले जाते.

जर तुम्ही टेक सेव्ही आहात आणि टेक्‍नॉलॉजीमध्ये चांगले भविष्य घडवू इच्छित असल्यास हा कोर्स करू शकता. भारतात इंटरनेट क्रांती सुरू झाली आहे. बऱ्याच कंपन्या इंटरनेट लक्षात ठेवून त्यांची मार्केटिंग योजना तयार करतात. येणारा काळ इंटरनेटचा असेल आणि डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञांची चांगली मागणी असेल.

आज डिजिटल मार्केटिंग कामासाठी कोणत्याही मर्यादा नाहीत. इंटरनेटद्वारे व्यवसाय करणाऱ्या लाखो कंपन्या आहेत आणि त्यापैकी बऱ्याच कंपन्यांना डिजिटल मार्केटिंग मॅनेजरची आवश्‍यकता आहे. पर्यटन, बॅंकिंग, रिटेल, मीडिया, हॉस्पिटॅलिटी आदी कंपन्यांना डिजिटल मार्केटिंग मॅनेजर आवश्‍यक असतात. परदेशी कंपन्यांमध्येही नोकरी मिळू शकते.

सुरवातीला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला चार-पाच लाखांचे वर्षाचे पॅकेज मिळते. परंतु ते अनुभवाने वाढते. बरेच अनुभवी डिजिटल मार्केटिंग मॅनेजर महिन्याला दोन ते अडीच लाख रुपये कमावतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *