WhatsApp चॅट Telegram वर असे करा ट्रान्सफर, जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २२ मे । या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सॲपने (WhatsApp) प्रायव्हसी पॉलिसी (privacy policy) बदलणार असल्याचं जाहीर केलं आणि जगभरातून त्यांच्यावर टीका झाली. त्यावेळी जर या गोपनीयता धोरणातील अटी-शर्ती मान्य केल्या नाही, तर तुमचं अकाउंट डिलीट (account delete) केलं जाईल, असं WhatsApp कडून सांगण्यात आलं होतं. मात्र खूप टीका झाल्यानंतर व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसी बदलणार नाहीत, तसंच आमच्याकडे युजर्सचा सर्व डेटा सुरक्षित आहे, असं आता कंपनीने जाहीर केलं.

मात्र, त्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी त्यांनी पुन्हा प्रायव्हसी पॉलिसी आणल्या आणि त्या स्वीकारण्यासाठीचा कालावधी 15 मेपर्यंत वाढवला. तसंच प्रायव्हसी पॉलिसी मान्य न केल्यास अकाउंट डिलिट होईल, असंही सांगितलं. मात्र, भारत सरकारने व्हॉट्सॲपच्या या धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केल्याने त्यांनी अकाउंट डिलीट करण्याच निर्णय मागे घेतलाय. तसंच जे लोक प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारणार नाहीत त्यांना सर्व फीचर्स (features) वापरता येणार नाहीत, असंही कंपनीने स्पष्ट केलंय. त्यामुळे लोकांचा टेलिग्राम (telegram) आणि सिग्नल (signal) ॲपकडे कल वाढतोय.

व्हॉट्सॲप हे सर्वात लोकप्रिय मेसेंजिंग ॲप आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपवरून दुसऱ्या मेसेंजिंग ॲपवर जाण्याचा सर्वात मोठा धोका चॅट डिलीट होण्याचा असतो. यावर टेलिग्रामनं उपाय शोधलाय. जर तुम्ही व्हॉट्सॲप वरून टेलिग्रामवर शिफ्ट झालात, तरी तुमचे चॅट्स सुरक्षित राहतील. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सॲप चॅट टेलिग्रामवर घेऊ शकता. यासाठी तुम्हाला टेलिग्रामचं एक फीचर वापरावं लागेल. तुमच्याकडे टेलिग्रामचे लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन असणं आवश्यक आहे. नसेल तर, तुम्ही प्ले स्टोरमध्ये जाऊन अपडेट करून घेऊ शकता.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, टेलिग्राम अपडेट केल्यानंतर व्हॉटसॲप ओपन करा. व्हॉट्सॲपवरून जे चॅट तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे, त्यावर क्लिक करा. तिथे वर असलेल्या तीन लाईन्सवर क्लिक करा. त्यानंतर एक्सपोर्ट चॅटवर क्लिक करा. शेअर मेन्यूमध्ये टेलिग्राम सिलेक्ट करा, त्यानंतर मीडियासोबत किंवा त्याशिवाय चॅट करण्याचा ऑप्शन दिसेल. ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. अशाप्रकारे तुम्हाला पाहिजे तेवढे चॅट एक-एक करून तुम्ही टेलिग्रामला मूव्ह करू शकता. एकाच वेळी अनेक चॅट मूव्ह करण्याचा ऑप्शन सध्या उपलब्ध नाही. तसंच ग्रुप चॅट्सदेखील तुम्ही अशाच प्रकारे एक्सपोर्ट करू शकता.

iOS वरुन WhatsApp चॅट्स टेलिग्रामवर (Telegram) मूव्ह करण्यासाठी तुम्ही हाच पर्याय वापरू शकता. जे चॅट्स तुम्ही व्हॉट्सॲपवरून टेलिग्रामवर एक्सपोर्ट (Export) केले त्या चॅट्समोर टेलिग्राममध्ये इम्पोर्टेड (Imported) असं लिहिलेलं दिसेल. त्यामुळे जर तुम्हाला व्हॉट्सॲपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारायची नसेल, तर आणि चॅटही सुरक्षित पाहीजे असेल तर तुम्ही टेलिग्रामच्या या फीचरचा वापर करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *