( काळ्या बुरशीचा ) म्युकरमायकोसिसचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधानांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे । केंद्रातील मोदी सरकारने ब्लॅक फंगस (म्यूकोरामायसिस) संबधित औषधाची कमतरता दूर करण्यासाठी युद्ध मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूनंतर महामारीचे रूप धारण केलेल्या काळ्या बुरशीच्या औषधाची व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली आहे. काळ्या बुरशीच्या उपचारासाठी लिपोसोमल एंफोटेरेसिरिन बी नावाचे एक इंजेक्शन वापरले जाते. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हे औषध मिळाल्यास ते भारतात आणावे, असे पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यासह, केंद्र सरकारने आणखी पाच कंपन्यांना लिपोसोमल एंफोटेरेसिरिन बी तयार करण्यासाठी परवाना दिला आहे.

पंतप्रधान मोदी काळ्या बुरशीचे वाढते रुग्ण आणि त्यावर औषधांच्या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत चर्चा करत आहेत. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार पीएम मोदी यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, जगातील कोणत्याही देशात हे औषध मिळत असेल तर ते त्वरित भारतात आणले जावे. यामध्ये जगभरातील भारतीय दूतावासांची मदत घेतली जात आहे. भारतीय दूतावास आपापल्या देशांमध्ये लिपोसोमल एंफोटेरेसिरिन बी ची माहिती घेत आहेत.

आता पंतप्रधान मोदींच्या या प्रयत्नांचे परिणामही पाहायला मिळत आहेत. अमेरिकेच्या गलियड साइंसेज नावाच्या कंपनीने मदत केली आहे. ही कंपनी भारतात रेमेडिसवीर देखील पुरवित आहे. आता ही कंपनी एंफोटेरेसिरिन बी देखील भारताला उपलब्ध करुन देत आहे. आतापर्यंत 121,000 डोस भारतात पाठवल्या गेल्या आहेत. लवकरच 85,000 डोस भारतात येणार आहेत. असं म्हटलं जात आहे की गलियड साइंसेजने मायलन मार्गे भारतात अ‍ॅम्फोटेरिसिन बीचे 10 लाख डोस पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

देशभरात काळ्या बुरशीच्या संसर्गाची 11,717 प्रकरणे नोंद झाली आहे. केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांनी बुधवारी ट्विट केले की, देशभरात उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येच्या आधारे उपचारात वापरल्या जाणार्‍या लिपोसोमल एंफोटेरेसिरिन बी चे 29,250 डोस राज्य / केंद्रशासित प्रदेशांना म्यूकोरामायसिसच्या उपचारासाठी देण्यात आल्या आहेत.

Also Watch

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *