महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । पुणे शहर (Pune City) व पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) इयत्ता अकरावी प्रवेशाची (Eleventh Admission) सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Merit List) बुधवारी जाहीर (Declare) करण्यात आली आहे. या दोन्ही महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालमधील अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने (Online Process) राबविली जात आहे. येत्या शुक्रवारी (ता.२७) विद्यार्थ्यांनी भरलेल्या महाविद्यालयांच्या पसंतीक्रमानुसार ‘अॅलोटमेंट लिस्ट’ प्रसिद्ध केली जाणार आहे.
ऑनलाइन केंद्रीय प्रवेश समितीतर्फे अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांना एका पातळीवर आणण्यासाठी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यावर विद्यार्थ्यांकडून आक्षेप स्वीकारण्यात आले. त्यानंतर बुधवारी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली,असे सहाय्यक शिक्षण उपसंचालक मीना शेंडकर यांनी सांगितले आहे. पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्येही प्रवेशासाठी (अलॉट झालेल्या) महाविद्यालयाचा तपशील दिलेला असेल. याशिवाय संबंधित महाविद्यालयांना देखील कॉलेज लॉगिनमध्ये प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे दिसू शकणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत आहे.
१९९ आक्षेपांचे निरसन –
पहिल्या नियमित फेरीच्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर सुमारे १९९ जणांनी आक्षेप व तक्रारी नोंदविल्या होत्या. त्या सर्वांचे निरसन केल्यानंतरच अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आल्याचे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील तपशील
कनिष्ठ महाविद्यालये : ३११
प्रवेशाच्या उपलब्ध जागा : १,११,२०५
कोट्यांतर्गत झालेले प्रवेश : ३, २२३
प्रवेशासाठी रिक्त जागा : १,०७, ९८२