![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआयच्या) निर्बधांना सामोरे जात असलेल्या रूपी को-ऑपरेटिव्ह बँके ला मुदतवाढ देण्यात आली आहे. रूपीवरील र्सवकष र्निबधांची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. आरबीआयने ही मुदत तीन महिने म्हणजेच ३० नोव्हेंबपर्यंत वाढवली आहे. आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने रूपीवर २१ फे ब्रुवारी २०१३ पासून र्निबध आणले आहेत. त्यानंतर या र्निबधांना सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे.
वसुलीसाठी बँक विविध उपाययोजना करत असून गेल्या पाच वर्षांत २६३.९३ कोटींची वसुली के ली आहे. तसेच ३१ मार्च २०१३ मध्ये असलेला ८४.३७ कोटींचा खर्च ३१ मार्च २०२१ पर्यंत ४८.३८ कोटींपर्यंत कमी के ला आहे. बँक गेली पाच वर्षे परिचलनात्मक नफ्यात असून पाच वर्षांत ७०.८२ कोटी रुपये नफा झाला आहे. आरबीआयच्या हार्डशिप योजनेखाली बँके ने ९५ हजार ८५ गरजू ठेवीदारांना ३७६.८१ कोटी रुपये परत के ले आहेत. बँके च्या वैधानिक लेखापरीक्षणामध्ये तसेच आरबीआयच्या वार्षिक तपासणीमध्ये उणे नक्त मालमत्ता (फार पूर्वीपासून असलेले अपवाद वगळून) कोणतेही गंभीर शेरे नाहीत. आरबीआयला त्यांची वार्षिक तपासणी तातडीने करण्याची विनंती के ली असून सप्टेंबरअखेर ती पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती बँके चे प्रशासक, सनदी लेखापाल सुधीर पंडित यांनी दिली.
राज्य शासनाने मंजूर के लेली एकरकमी परतफे ड योजना काटेकोर राबवण्यात येत असून अंतर्गत आणि वैधानिक तपासणीत कोणतेही दोष आढळलेले नाहीत. बेपत्ता थकबाकीदार, कर्ज चुकवण्याच्या दृष्टीने मालमत्ता वर्ग के ल्या असतील, तर बँक त्यांच्यावर फौजदारी दावे दाखल करत आहे. महाराष्ट्र सहकारी कायदा कलम ८८ खालील चौकशीमधील दोषी संचालक व अधिकाऱ्यांनी के लेल्या अपिलांवरील निर्णय येण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी पाठपुरावा के ला जात आहे, असेही पंडित यांनी सांगितले.