रेल्वे प्रवासाचा प्लान अचानक बदलला तर तिकीट रद्द न करता असा करा प्रवास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । अनेकदा आपला रेल्वे प्रवासाचा प्लान ठरतो आपण तिकीट बुकींगही करतो. मात्र, काही कारणामुळे या प्लानमध्ये बदल होतात. तारीख – वार किंवा वेळेच्या बदलामुळे आपल्यावर तिकीट रद्द करण्याची वेळ येते. बऱ्याचदा लोक बूक केलेलं रेल्वेचं तिकीट रद्द करून दुसरं तिकीट बूक करतात. यामध्ये तुमचे पैसेही कापले जातात. परंतु, रेल्वेच्या नियमानुसार आणि सुविधेनुसार, पहिलं तिकीट रद्द न करता तुम्हाला दुसरं तिकीट बूक करता येऊ शकतं. हे तुम्हाला माहीत आहे का?

रेल्वेच्या नियमानुसार, तुमच्या प्रवासाचा प्लान बदलला तर तुम्हाला रेल्वे प्रवासाची तारीख आणि वेळही रेल्वेच्या उपलब्धतेनुसार आणि तुमच्या सुविधेनुसार बदलण्याची सोय उपलब्ध आहे. यामुळे तुम्हाला तुमचा प्रवास ‘प्रीपोन्ड’ किंवा ‘पोस्टपोन्ड’ करता येऊ शकतो.

मूळ बोर्डिंग स्टेशनच्या स्टेशन मॅनेजरला लिखित स्वरुपात अर्ज देऊन रेल्वे सुटण्यापूर्वी कमीत कमी २४ तास अगोदर कोणत्याही कम्प्युटराईज्ड रिझर्व्हेशन सेंटरवर जाऊन प्रवासी बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करू शकतात. ही सुविधा ऑफलाईन तर उपलब्ध आहेच परंतु, ऑनलाईन बुकिंगमध्येही तुम्हाला हा पर्याय उपलब्ध आहे.

जर तुम्हाला तुमचा प्रवास आणखी वाढवायचा असेल अर्थात ज्या स्टेशनपर्यंत बुकींग केलेलं आहे त्याच्या पुढच्या काही स्टेशनपर्यंत जायचं असेल तरीही रेल्वेकडून ही सुविधा मिळते. यासाठी प्रवाशांना बुक केलेला प्रवास पूर्ण होण्याअगोदर तिकीट चेंकिंग स्टाफशी संपर्क साधावा लागेल.

रेल्वे स्टेशन काऊंटरवर बुक करण्यात आलेल्या तिकीटाच्या तारीख जास्तीत जास्त एक वेळा बदल करण्यात येऊ शकतो. मग जागेची उपलब्धता कन्फर्म असो किंवा आरएसी किंवा वेटिंग असो… प्रवासाची तारीख पुढे ढकलण्यासाठी किंवा निश्चित दिवसाच्या अगोदरच प्रवास करण्यासाठी प्राशांना रिझर्व्हेशन कार्यालयात जाऊन रेल्वे सुटण्यापूर्वी ४८ तास अगोदर आपलं तिकीट सरेंडर करावं लागेल. ही सुविधा केवळ ऑफलाईन तिकीटांसाठी उपलब्ध आहे. ऑनलाईन बूक करण्यात आलेल्या तिकीटांवर ही सुविधा उपलब्ध नाही.

भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना आपलं कन्फर्म, आरएसी किंवा वेटिंग तिकीटाच्या प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधाही दिली जाते. रेल्वेच्या नियमांनुसार, या तिकीटांवर प्रवासाची तारीख निर्धारित शुल्क भरल्यानंतर त्याच श्रेणीत किंवा उच्च श्रेणीत किंवा ठरलेल्या स्थानापर्यंत प्रीपोन्ड किंवा पोस्टपोन्ड केली जाऊ शकते.

याशिवाय रेल्वे प्रवाशांना आपल्या प्रवासाचा विस्तार करण्याचा, बोर्डिंग स्टेशन बदलण्याचा किंवा आपलं तिकीट उच्च श्रेणीत अपग्रेड करण्याची सुविधा मिळते. यातील काही सुविधा केवळ ऑफलाईन तिकीटांसाठी लागू आहेत. मात्र इतर सुविधा ऑफलाईन आणि ऑनालाईन दोन्ही स्वरुपातील तिकीटांसाठी उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *