Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold Rate Today: सोन्याच्या दरात आजही घसरण, चांदीचे दर देखील उतरले - Maharashtra 24

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आजही घसरण, चांदीचे दर देखील उतरले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ सप्टेंबर । आज सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price Today) आजही घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत (Gold price today) 0.15% नी कमी झाली आहे. तर चांदीच्या दरात (silver price today) 0.22 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत (Gold price today on Multi commodity Exchange) 0.15% नी कमी होऊन 46,001 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. तर चांदीचे दर देखील (silver price) 0.22 टक्क्यांनी कमी होऊन 60,503 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी निर्माण झाली आहे कारण सोने रेकॉर्ड हाय स्तरापेक्षा 10,200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. आज MCX वर सोन्याचा दर 46,001 रु. प्रति तोळा आहे. या दराच्या तुलनेत आज सोन्याचा दर 10,200 रुपयांनी कमी आहे.

तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *