महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ नोव्हेबर । धनत्रयोदशीच्या मुहूर्ताला सोनं खरेदीला जाण्याची विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज मंगळवारी धनत्रयोदशीला सोनं आणि चांदी स्वस्त झाले आहे. मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजवर सोनं जवळपास १०० रुपयांनी तर चांदीमध्ये १७५ रुपयांची घसरण झाली आहे. सोनं ४७८१० रुपये प्रती १० ग्रॅम आहे.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७७८४ रुपये इतका खाली आला आहे. त्यात १०४ रुपयांची वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव ६४६२६ रुपये असून त्यात १६५ रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी चांदीने ६४५४४ रुपयांचा स्तर गाठला होता.
काल सोमवारी सोनं ६० रुपयांनी तर चांदी १२० रुपयांनी स्वस्त झाली होती. तर शुक्रवारी बाजार बंद होताना सोने ३५४ रुपयांनी कमी होऊन ४७६०७ रुपयांवर स्थिरावले होते.चांदीदेखील ३९१ रुपयांनी स्वस्त झाली होती. चांदीचा भाव ६४५४० रुपयांवर स्थिरावला होता.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७७४० रुपयांवर आणि २४ कॅरेटचा भाव ४७७४० रुपयांवर स्थिर आहे. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८५० रुपये झाला. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५११०० रुपयांवर स्थिर आहे.
आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५०८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१८० रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९८५० रुपये इतका आहे.
आज जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १७८१.७८ डॉलर प्रती औंस आहे. त्यात ०.१ टक्क्याची घसरण झाली. चांदीचा भाव ०.२ टक्क्यांनी घसरला असून तो २३.८१ डॉलर झाला आहे.