महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ नोव्हेबर । दिवाळीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची मागणी घटली आहे. त्यामुळे गेली महिनाभर वधारलेले दर काही प्रमाणात बुधवारी कमी झाले. १० ते २० टक्के दर उतरले आहेत. एपीएमसी बाजारात भाज्यांची बुधवारी ४६८ गाडी आवक झाली. घाऊक बाजारात भेंडी ४० रुपये;, फ्लॉवर २० २३ कोबी १२ रुपये प्रतिकिलो दर मिळाले.कांदा २८ रुपये किलो महिनाभरापासून कांद्याचे दर वाढले होते. त्यात आता ५ रुपयांची घसरण झाली असून २८ ते २९ रुपयांवर कांदा दर आले आहेत.
झेंडू ३० तर शेवंती ४० रुपये प्रतिकिलो मुंबई : मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर फुलांचे भाव गडगडले. गेल्या दिवाळीला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने झेंडूची विक्री झाली होती. मात्र बुधवारी दर गडगडल्याने झेंडू ३० रुपये प्रतिकिलो विकला जात होता. राज्यभरात फुलांचे मुबलक पीक आल्याने आवक वाढली असून झेंडूसह सर्वच फुलांचे दर कोसळल्याने ऐन दिवाळीत व्यापारी काळजीने ग्रासले आहेत.