अन्न प्रक्रिया उद्योगावरील जीएसटी दर कमी करण्याची गरज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ नोव्हेबर । सरकारकडून अन्न प्रक्रिया उद्योगावर लागू करण्यात आलेला वस्तू व सेवा कर(जीएसटी) दर कमी करण्याची आवश्यकता असून यामध्ये पॅकबंद ब्रँडेड व बिगर ब्रँडेड खाद्य यांचाही समावेश आहे. सदरील उत्पादनावरील जीएसटी दर कमी करण्याची मागणी असोचॅमने केली आहे.

सध्याच्या कालावधीत ब्रँडेड व पॅकबंद खाद्य उत्पादनात बटाटा चिप्स, स्नॅक्स असे पदार्थ 12 टक्के स्लॅब अंतर्गत येतात परंतु बिगर ब्रँडेड चिप्ससह अन्य उत्पादनावर पाच टक्के कर आकारणी केली आहे. अन्न प्रक्रियेच्या अंतर्गत करण्यात येणारे सद्यकाळातील उत्पादन हे 158.69 अब्ज डॉलरचे आहे. भारतामधील सर्वात महत्वपूर्ण क्षेत्रांपैकी एक म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग आहे. हे क्षेत्र कोविडनंतर संघर्ष करत असल्याचे असोचॅमने स्पष्ट केले आहे.

सदरचा उद्योग हा कृषी आणि अन्न विक्रीशी संबंधीत आहे. याचा प्रभाव हा सामाजिक, आर्थिक क्षेत्रावर पडत असून काही काळ या उद्योगाने अडचणींचा प्रवास केला असल्याचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपति कुमार पारस यांना लिहलेल्या पत्रात असोचॅमने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलिया, मलेशिया, कॅनडा आणि थायलंडसह अन्य देशामध्ये अन्न प्रक्रिया उत्पादनावर शून्य शुल्क आकारणी आहे, तर जर्मनी, इटली, फ्रान्स आणि स्विर्त्झलँडमध्ये पॅकबंद उद्योगावर फक्त 2.5 ते 7 या दरम्यान कर आकारणी होत असल्याचे असोचॅमने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *