आज सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या नवे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ डिसेंबर । आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली. आज सोने २५० रुपयांनी तर चांदी १०० रुपयांनी वधारले होते.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सध्या सोन्याचा ४७६४५ रुपये असून त्यात २२४ रुपये वाढ झाली आहे. तत्पूर्वी आज सोन्याचा भाव ४७६७१ रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव ६१२३० रुपये असून त्यात १०७ रुपये वाढ झाली आहे. तत्पूर्वी चांदीचा भाव ६१४९० रुपये इतका वाढला होता.

दरम्यान, कमॉडिटी बाजारात काल गुरुवारी सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये गुरुवारी सोन्याचा भाव ४७४१८ रुपयांवर बंद झाला. त्यात ४५४ रुपयांची घसरण झाली. एमसीएक्सवर गुरुवारी बाजार बंद होताना एक किलो चांदीचा भाव ६११२० रुपयांवर स्थिरावला होता. त्यात १८७ रुपयांची घसरण झाली होती.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६५८० रुपये झाला असून त्यात ५८० रुपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेटचा भाव ४७५८० रुपये इतका खाली आला आहे. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६०० रुपये इतका खाली आला आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५०८४० रुपये आहे. त्यात १५० रुपयांची घसरण झाली. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४७३० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८८०० रुपये इतका आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९५५० रुपये इतका आहे.

आज जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा भाव १७७१.०१ डॉलर प्रती औंस झाला. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव १७८२.५० डॉलर प्रती औंस झाला. चांदीचा भाव २२.३७ डॉलर प्रती औंस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *