महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ डिसेंबर । डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झालेला एक रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. याआधी कर्नाटक, गुजरातमध्ये ओमिक्रॉनने आपले हातपाय पसरले होते. ओमिक्रॉनने आता महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. डोंबिवलीत राज्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे देखील टोपे म्हणाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनग्रस्त रुग्णाने लस घेतलेली नव्हती.
तसेच पुढे बोलताना “डोंबिवलीत कोरोनाचा रुग्ण ढाळल्यानंतर टोपे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद केला आहे. “घाबरण्याचे शून्य टक्केदेखील कारण नाही. या विषाणूचा मृत्युदर खूप कमी आहे. मात्र त्याचा संसर्गदर खूप आहे. डोंबिवलीत आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घ्यावा लागेल. त्यांचीदेखील चाचणी करावी लागेल. मला तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णाच्या संपर्कात पाच मिनिटेजरी एखादा व्यक्ती आला तर त्यालादेखील ओमिक्रॉनची लागण होते,” असे राजेश टोपे यांनी म्हणाले.
डोंबिवलीतील रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. त्याला सौम्य लक्षणे आहेत. अंगदुखी, खोकला, डोकेदुखी अशा प्रकारची लक्षणे या रुग्णात आहेत. आज आपल्याला संसर्ग टाळायचा आहे. सध्या 28 नमुने ओमिक्रॉनची चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल दोन ते तीन दिवसांत येतील,” अशी माहिती टोपे यांनी दिली. तसेच कोरोना नियम शंभर टक्के पाळायला हवेत. नागरिकांनी लसदेखील घ्यावी, असेदेखील टोपे म्हणाले.