Gold Price Today: सोने पुन्हा एकदा महागले, चांदीत घसरण , पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ डिसेंबर । सोन्याच्या भावात बुधवारी तेजी पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात (Gold Price in Delhi) 8 डिसेंबरला सोन्याच्या किमतीत उसळी नोंदवली गेलीय. सोन्याच्या दरात आज 177 रुपये तेजी पाहायला मिळाली, तर चांदीच्या किमती (Silver Price in Delhi) 1112 रुपये प्रति किलोग्राम घसरण झालीय.

सोन्याचा भाव कसा तपासाल?
आपण घर बसल्या सोन्याचे भाव (Know how to check Gold Rates) तपासू शकता. फक्त आपल्याला 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर आपल्या फोनवर मेसेज येईल, ज्यात ताजे भाव तपासता येतील.

या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्यापूर्वीचा शेवटचा आठवडा सोन्याच्या घसरणीचा आठवडा होता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाईटनुसार, 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान सोने प्रति 10 ग्रॅम 574 रुपयांनी आणि चांदी प्रति किलो 2200 रुपयांनी स्वस्त झाली. म्हणजेच दोन दिवसांच्या वाढीनंतरही सोने पुन्हा स्वस्त झाले. चांदी अजूनही 29 नोव्हेंबरच्या पातळीच्या खाली आहे.

बाजार तज्ज्ञांच्या मते, कोविड ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारांची भीती वाढल्यास सोने-चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात. किंबहुना अर्थव्यवस्थेतील दबावाची चिन्हे पाहता गुंतवणूकदार अधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्यातील गुंतवणूक वाढवतात. गेल्या वर्षी कोविडमध्येही असेच दिसून आले होते, जेव्हा भौतिक सोन्याची मागणी नसतानाही गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे सोन्याच्या किमती सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *