Ashes|AUSvsENG : मालिकेत आघाडी ; कांगारुंची विजयी सुरुवात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ डिसेंबर । ऑस्ट्रेलियाने (Australia) गाबा कसोटीत (Gabba Test) इंग्लंडचा चौथ्या दिवशी इंग्लंडचा 9 विकेट्सनी पराभव केला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने अॅशस मालिकेत (Ashes Test Series) 1 – 0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात 297 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 20 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 9 फलंदाज राखून पार केले. नॅथन लायनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला चौथ्या दिवशी खिंडार पाडले. त्याने 4 विकेट घेतल्या. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 2 बाद 220 वरुन सर्वबाद 297 अशी झाली. (Ashes AUSvsENG Australia Won 1st Test Against England at Gabba)

इंग्लंडने (England) चौथ्या दिवशी 2 बाद 220 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र लायनने डेव्हिड मलानला 82 धावांवर बाद करत रूट – मलान ही दीडशतकी भागीदारी करणारी जोडी फोडली. येथूनच इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला मोठी गळती सुरु झाली. बघता बघता 2 बाद 220 वर असणऱ्या इंग्लंडचा दुसरा डाव 297 धावा संपुष्टात आला. (Ashes Test Series)

ऑस्ट्रेलियाकडून ऑफ स्पिनर नॅथन लायनने (Nathan Lyon) 91 धावा देत 4 बळी टिपले. त्याला कमिन्स आणि ग्रीनने प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली. स्टार्क आणि हेजलवूडने प्रत्येकी 1 विकेट घेतली. इंग्लंडला दुसऱ्या डावात फक्त 19 धावांचीच आघाडी घेता आली.

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 20 धावांची गरज होती. मात्र या 20 धावा करतानाही ऑस्ट्रेलियाने एक फलंदाज गमावला. अॅलेक्स कॅरीला रॉबिन्सनने 9 धावांवर बाद केले. अखेर ऑस्ट्रेलियाने 6 व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब करत गाबावरील विजयी परंपरा कायम ठेवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *