आयकर रिटन भरणाऱ्यांच्या संख्येत घट; …या कारणांमुळे घटली करदात्यांची संख्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ डिसेंबर । चालू वर्षामध्ये आयकर रिटन भरणाऱ्यांची संख्या कोविडपूर्व काळापेक्षा तुलनेने खूपच कमी आहे. आयकर रिटन भरण्याची शेवटची तारीख जवळ आली असताना देखील इनकम टॅक्स भरण्याच्या प्रक्रियेला म्हणावी तशी गती मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे. सर्वसाधारणपणे आयकर रिटन भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै असते. परंतु कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून इनकम टॅक्स भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. सुरुवातीला आयकर रिटन भरण्यासाठी 31 सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला होता. मात्र इनकम टॅक्स विभागाच्या साईटवर काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यामुळे आयकर रिटन दाखल करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारकडून आयकर रिटन भरण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. आता आयकर रिटन दाखल करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. मात्र तरी देखील यावर्षी आयकर रिटन दाखल करणाऱ्यांची संख्या कमीच आहे.

आयकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 6.74 कोटी लोकांनी इनकम टॅक्स भरला होता. परंतु या वर्षी आतापर्यंत केवळ 3.7 कोटी लोकांनीच आयकर रिटन दाखल केला आहे. याचाच अर्थ या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये केवळ अर्ध्या लोकांनी इनकम टॅक्स भरला आहे. आयकर रिटन दाखल करण्याची शेवटी तारिख 31 डिसेंबर आहे. मागील पातळी गाठण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत आणखी 3.7 कोटी करदात्यांनी कर भरणे अपेक्षीत आहे. दिवसाला 13 लाख करदात्यांनी कर भरला तरच आपण ते उद्दिष्ट गाठू शकू, मात्र सध्या दिवसाकाळी केवळ चार लाख लोकच आयकर रिटन दाखल करत असल्याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे.

इनकम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या घटली आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणेज वेबसाईमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या तात्रिक समस्या हे आहे. इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर आयकर रिटन दाखल करताना अनेक समस्या येत आहेत. त्या वेळेवर दूर होत नसल्याने करदात्यांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच कोरोनाचा मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोनाकाळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या होत्या, त्यातील अनेकांना आजूनही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. त्यांचे आर्थिक स्त्रोत बंद असल्याने त्यांनी इनकम टॅक्स भरला नाही, त्यामुळे यंदा आयकर रिटन दाखल करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *