![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ डिसेंबर । कोविड 19 (Covid-19) च्या व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे (Omicron) संपूर्ण जगात भीती पसरली आहे. बऱ्याच देशांमध्ये त्याचा प्रसार वेगाने होत आहे. आता याचा फायदा हॅकर्स घेत आहेत. सायबर क्रिमिनल्स (Cyber Criminals) Gmail वापरकर्त्यांना ओमिक्रॉनच्या नावाने ई-मेल (E Mail) पाठवून फसवण्याचा (Fraud) प्रयत्न करत आहेत. यूके (UK) आधारित सुरक्षा फर्म इंडिव्हिज्युअल प्रोटेक्शन सोल्यूशन्स (Individual Protection Solutions – IPS) ने वापरकर्त्यांना Gmail फिशिंग हल्ल्याच्या नवीन सिरीजबद्दल चेतावणी दिली आहे. (Gmail users are getting financial fraud in the name of Omicron)
फसवणुकीची नवीन पद्धत
Gmail वर अनेक वापरकर्त्यांना बनावट ई-मेल पाठवला जात आहे. त्यात असा दावा केला जात आहे, की नवीन पीसीआर चाचणी ओमिक्रॉन व्हेरिएंटला ओळखेल, जेणेकरून लोक सुरक्षितपणे प्रवास करू शकतील आणि सेल्फ आयसोलेशनची गरज भासणार नाही. ओमिक्रॉन पीसीआर चाचणीसाठी विलंब न करता खालील लिंकवर क्लिक करा, असे ई-मेलमध्ये म्हटले आहे. लिंकवर क्लिक करणे म्हणजे तुम्ही पुरते फसणार हे नक्की.
तुम्ही लिंकवर क्लिक करताच, तेथे तुम्हाला नाव, पत्ता आणि बॅंक खाते क्रमांक यांसारखे तपशील देण्यास सांगण्यात येईल. वरवर पाहता सध्या कोरोना विषाणूच्या (Corona Virus) नवीन व्हेरिएंटसाठी अशी कोणतीही चाचणी नाही किंवा असा कोणताही अधिकृत ई-मेल पाठविला जात नाही. तुमचे वैयक्तिक आणि बॅंक तपशील देऊन, तुम्ही फसवणूक करणाऱ्याला तुमचे बॅंक खाते रिकामे करण्याची संधीच देता. ज्यांना चाचणी लवकर बुक करायची आहे ते लोक या सापळ्यात सहज अडकू शकतात.
या गोष्टी ठेवा लक्षात…
असे ईमेल आरोग्य संस्थेकडून पाठवले जात नाहीत.
तरीही तुम्हाला असे ईमेल आले तर ईमेल पाठवणाऱ्याचा पत्ता तपासा
ईमेलमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती कधीही शेअर करू नका.
नवीन व्हेरिएंटसाठी अधिकृतपणे अशी कोणतीही चाचणी नाही.
असे ईमेल त्वरित डिलीट करा.