Group Captain Varun Singh : हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर आज अंत्यसंस्कार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । तामिळनाडूतील कन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Varun Singh) यांचं पार्थिव गुरुवारी विमानानं बंगळुरुहून भोपाळला नेण्यात आलं. आज त्यांच्या पार्थिवावर बैरागढ येथील विश्राम घाटावर शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग आणि भोपाळ हुजूर मतदारसंघाचे आमदार रामेश्वर शर्मा, जिल्हाधिकारी अविनाश लावनिया, अतिरिक्त पोलिस आयुक्त इर्शाद वली तसेच, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांनीही ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.

हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बंगळुरू येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. हवाई दलाच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून ग्रुप कॅप्टन वरुण सिंह बचावले होते. त्यांच्यासोबत असलेल्या इतर 13 जणांचा मृत्यू झाला होता. वरुण सिंह (Varun Singh) यांच्यावर बंगळुरुतील रुग्णालयात उपचार सुरु होते.

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये काही दिवसांपूर्वी भारतीय हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंह बचावले होते. परंतु, ते गंभीर जखमी होते. त्यांच्यावर बंगळुरु येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं निधन झालं आहे. दरम्यान, हेलिकॉप्टर दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतीय हवाईदलातील विंग कमांडर वरुण सिंह यांना याआधी शौर्य चक्र देऊनही सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी भारतीय हवाईदलासाठी केलेल्या सेवेसाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. तसंच याआधी तेजस विमानाच्या फ्लाईट सिस्टम फेलियर झाली असताना यशस्वीरित्या विमानचं लँडिग करत दुर्घटना होण्यापासून रोखलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *