पुढील 24 तासात , काय असेल महाराष्ट्रातील हवामान?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ जानेवारी । मागील काही आठवड्यांपासून भारताची राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील अनेक राज्यात जोरदार थंडीचा कहर (Cold wave) सुरू आहे. बहुतांशी ठिकाणचं किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेलं आहे. आज राजधानी दिल्लीत किमान तपामान 8 अंशावर पोहोचलं आहे. अन्य ठिकाणी देखील कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम आहे. पुढील चोवीस तासात ईशान्य आणि मध्य भारतात थंडीची तीव्र लाट (Severe cold wave) येण्याची शक्यता आहे. परिसरातील नागरिकांना हवामान खात्याने (IMD) सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चोवीस तासांत दिल्लीसह, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, उत्तर प्रदेश, राजस्थान याठिकाणी थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. याठिकाणी आयएमडीकडून थंडीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यानंतर थंडीचा जोर हळुहळू कमी होण्याची शक्यता आहे. 21 जानेवारीपासून ईशान्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी थंडीचा कडाका (cold wave in maharashtra) कायम आहे. हवामान खात्याकडून आज महाराष्ट्रात कोणताही इशारा दिला नाही. पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. आज धुळे जिल्ह्यात 7.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची (temperature in dhule) नोंद झाली आहे.

 

आज सकाळपासूनच धुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तर परभणीचं तापमान 11.2 अंशावर गेलं आहे. त्याचबरोबर बीडमध्येही थंडीचा कडाका कायम आहे. शहारात सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. पहाटे पडणाऱ्या दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पहाटे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा त्रास होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *