महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ एप्रिल । सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भोंगे बंद करता येणार नाहीत फक्त आवाजाची मर्यादा पाळावी, कायदा सर्वांसाठी समान आहे, तर वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी भुमिका घेता येणार नाही. सगळ्यांसाठी एकच भुमिका आपल्याला घ्यावी लागेल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारी आहे. असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. आज भोंग्याबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली असून, त्यावर गृहमंत्री बोलत होते.
पुढे पाटील म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर जर हा निर्णय घेतला किंवा त्याला देशात लागू केला तर राज्या-राज्यांमध्ये वेगवेगळी परिस्थिती राहणार नाही. त्यामुळे आवश्यकता असलेल्या सर्व पक्षांनी शिष्टमंडळ घेऊन केंद्रातल्या प्रमुख नेत्यांना त्यांनी भेटावे, त्यानंतर त्यांनी देशपातळीवर ही भुमिका स्पष्ट करावी, अशी राज्य सरकारची भुमिका असल्याचे पाटील म्हणाले.
पुढे गृहमंत्री म्हणाले की, मी यासंबधी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. सध्या आहेत त्या गाईडसलाईन्स पुराशा आहेत की, नाही किंवा त्यात काही आवश्यकता आहे का? कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाला तर पोलिस कारवाई करेल. असे ही गृहमंत्री म्हणाले.
पुढे पाटील म्हणाले की, मी हे स्पष्ट करू इच्छितो की, केंद्राचे हे जे जज्मेंट आहे ते, पर्यावरणाच्या संदर्भातला आहे. नॉईस पोलिसांच्या संदर्भातला आहे. त्यामुळे हे सगळे जीआर पर्यावरण विभागाने काढले आहे. गृहखाते त्याची अमलबजावणी करण्याचे काम करतो आहे. असे पाटील म्हणाले.
सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भोंगे वापरण्यास परवानगी
सध्या सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भोंगे वाजवण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच भोंगे वाजवण्यास सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. बंदी घालत असताना आवाजाची मर्यादा देखील झोन प्रमाणे ठरवून दिली आहे. असे गृहमंत्री म्हणाले.