सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित संतोष जाधवला​​​​ गुजरातमधून अटक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ जून । प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयिताला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली आहे. संतोष जाधव असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. रविवारी रात्री उशिरा त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याचा साथीदार सौरभ ऊर्फ सिध्देश ऊर्फ महाकाल हिरामण कांबळे याला संगमनेरमधून अटक केली होती.

पंजाबमध्ये 29 मे रोजी मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली होती. या खून प्रकरणात पंजाब, राजस्थानमधील लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी आठ संशयित हल्लेखोरांबद्दल माहिती काढून तपासाला गती दिली. त्यामध्ये मंचरमधील सराईत संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सौरभ महाकाळ यांचा संशयित आरोपींचा समावेश होता.

खूनानंतर फरार

पुर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार संतोष जाधव याने साथिदारांसह मिळून ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले याच्यावर पिस्तूलातून गोळ्या झाडून खून केल्याची घटना ऑगस्ट 2021 मध्ये घडली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *