महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी पदभार स्विकारल्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानावर आता अधिक सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान अति महत्वाचे ठिकाण म्हणून घोषित केले आहे.
शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद गाठले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे हे कामाला लागले आहे. अजूनही एकनाथ शिंदे हे गोव्यातच आहे. बंडखोर आमदारांची बैठक घेण्यात आली आहे. त्यानंतर सर्व आमदारांना घेऊन ते मुंबई पोहोचणार आहे.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या सुरक्षेचा घेतला आढावा घेण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्त आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान अति महत्वाचे ठिकाण म्हणून घोषित केले आहे.
बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात केले जाणार आहे. विशेष बॅरेगेटींग करुन सर्व एन्ट्री पाँईंट बंद केले जाणार आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवली जाणार आहे.