महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । महविकास आघाडीच्यावतीने (mahavikas aghadi) राजन साळवी (rajan salavi) यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. अवघे काही मिनीटे राहिले असताना शिवसेनेचे (shiv sena) कोकणातील (Konkan) सामान्य कुटुंबातील निवडून आलेले आमदार राजन साळवी यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार चेतन विठ्ठल तुपे (ncp) हे सुचक तर काँग्रेसचे (congress) आमदार संग्राम थोपटे हे अनुमोदक झाले आहेत. परंतु काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवत महाविकास आघाडीकडून शिवसेनेला संधी देत राजन साळवी यांचा अर्ज दाखल केला आहे.
काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मविआ सरकार असताना थोपटेच विधानसभा अध्यक्ष होतील असे सांगितले जात होते पण आता सरकार पडल्यानंतरही काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद मिळाले नाही, उलट ते अनुमोदक झाले असल्याने काँग्रेस नाराज होईल का बोलले जात होते परंतु त्यांनी राजन साळवी यांनी पाठींबा दिला आहे. दरम्यान भाजपकडून विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहूल नार्वेकर यांचे नाव निश्चित झाले आहे.