राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवारांनी बोलावली बैठक ; विरोधीपक्ष नेता कोण असेल ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । राज्य विधीमंडळामध्ये आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये भाजप-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला. यानंतर आता विरोधीपक्ष नेतेपदी कोण असेल? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी आज बैठक बोलावली आहे. (Who will be Leader of the Opposition Sharad Pawar called a party meeting)

बैठकीबाबत माहिती देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत दोन विषय चर्चेसाठी असणार आहेत. एकतर उद्या होणारा विश्वासदर्शक ठराव आणि विरोधीपक्ष नेतेपदी कोणाची निवड करायची? यावर चर्चा होईल”

राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘या’ नेत्यांची नावं चर्चेत
विरोधीपक्ष नेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्यासह जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *