नाशिकचे सप्तश्रुंगी देवी मंदिर पुढील दीड महिना बंद राहणार, मंदिर ट्रस्टचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । नाशिकच्या (Nashik) सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) काल सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसाने हजारी लावली. यावेळी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर पुराचा लोंढा आल्याने भाविक जखमी झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता सप्तशृंगी देवी मंदिर पुढील दीड महिना बंद राहणार असल्याची माहिती सप्तशृंगी देवी ट्रस्ट (Saptshrungi Devi Trust) वतीने देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) वणी येथील सप्तशृंगी गडावर चार वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसामुळे भाविक भयभीत झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची तारांबळ होऊन सहा ते सात भाविक जखमी झाले होते. या मंदिर मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ, दगड, कचरा इतर साहित्य येऊन पडल्याने मार्ग देखील खचल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता सप्तशृंगी देवी ट्रस्टने मंदिर पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातील साडे तीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांचा मोठा राबता असतो. अशातच गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक गावातील संपर्क तुटला आहे. तर काल सायंकाळी सप्तशृंगी मंदिर मार्गावर अचानक झालेल्या ढगफुटीमुळे भाविकांना सुचेनासे झाले. यानंतर या मार्गाची दयनीय अवस्था झाली असून मंदिर गाभाऱ्यात देखील स्वच्छतेची आवश्यकता असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या ठिकाणी संपूर्ण परिसराची त्या बांधकामाची देखभाल दुरुस्ती करावी, नव्याने बांधकाम करण्यासाठी देवस्थान ट्रस्टला वेळ आवश्यक असल्याने मंदिर बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील 45 दिवस म्हणजे दीड महिना सप्तशृंगी देवीचे दर्शन घेता येणार नाही.

नाशिक जिल्ह्यात सुरु असलेला, त्यातच सप्तश्रुंगी गडावर झालेली ढगफुटी यामुळे या परिसराची देखभाल करण्यात येणार आहे. टायचबरोबर देवी मूर्तीचे संवर्धन करण्यात येणार असल्याने 21 जुलैपासून ते पाच सप्टेंबर पर्यंत मंदिर हे पूर्णपणे बंद राहणार आहेत. तयामुळे सप्तश्रुंगी देवीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही. तर भाविकांच्या सोयीसाठी देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराची शेवटच्या पायरीवर देवीची एक छोटी मूर्ती ठेवली जाणार आहे. त्या मूर्तीद्वारे भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *