दिल्लीमध्ये आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण ; आरोग्य यंत्रणा सतर्क

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । जगभरात कोरोना महामारी मागोमाग आता मंकीपॉक्स विषाणूचा (Monkeypox Virus) उद्रेक होताना दिसत आहे. भारतातही आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग पसरताना दिसत आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत माहिती देत, दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट केलं आहे. दिल्लीमध्ये एका रुग्णाला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. दिल्लीमध्ये 31 वर्षीय इसमाला मंकीपॉक्सची लागण झाली आहे.

मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाला दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाने आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याची कोणतीही माहिती नाही. या रुग्णाने परदेशात प्रवास केला नसल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

भारतात आतापर्यंत चार रुग्णांना मंकीपॉक्स विषाणूची लागण झाली आहे. दिल्लीत नव्याने आढळेल्या रुग्णाआधी भारतात तीन रुग्णांची नोंद झाली होती. याआधी आढळलेले मंकीपॉक्सचे तीनही रुग्ण केरळमधील आहेत. या बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर भारतातील मंकीपॉक्सचे रुग्णही वाढताना दिसत आहेत. जगातील वाढता मंकीपॉक्सचा संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (Director-General of WHO) टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *