महाराष्ट्रात ५५२ नवे करोना पॉझिटिव्ह, १९ जणांचा मृत्यू, संख्या ५ हजार २०० च्याही पुढे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – आज महाराष्ट्रात ५५२ नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासात करोनाची लागण झाल्याने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या आता ५ हजार २१८ इतकी झाली आहे. २४ तासात जे १९ मृत्यू झाले आहेत त्यापैकी १२ मृत्यू मुंबईत पुण्यात तीन , पिंपरीत १ सांगलीत १ आणि ठाण्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे. आज ज्या रुग्णांचे मृत्यू झाले त्यापैकी १० पुरुष आहेत तर नऊ महिला आहेत. २४ तासातील १९ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ९ रुग्ण आहेत. तर ९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले आहेत. एक रुग्ण चाळीस वर्षांखालील आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज झालेल्या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले. करोनामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या २५१ झाली आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आजपर्यंत राज्यातून ७२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक हे होम क्वारंटाइन आहेत. तर ७ हजार ८०८ लोक हे संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *