…अजूनही दरवाजे खुले ; शिवसेनेच्या नेत्याचे मोठे विधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेले आमदार शहाजी बापू पाटील आणि उदय सामंत यांनी एकत्र येण्याचे भाष्य केलं आहे. ‘त्यांनी आधीही भूमिका घेतली असती तर ही वेळ आज आली नसती, अजूनही वेळ गेली नसून दरवाजे खुले आहे’, अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते सचिन अहिर (sachin ahir) यांनी दिली.

महिना झाला तरी अजूनही विस्तार झाला नाही त्यामुळे शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे चलबिचल सुरू असल्याचे समोर आले आहे. अशाच दीपक केसरकर, शहाजी बापू पाटील आणि उदय सामंत यांनी शिवसेना आणि शिंदे गटाने एकत्र येण्याचे भाष्य केले आहे, त्यांच्या या विधानावर सचिन अहिर यांनी भाष्य केलं.

‘शहाजी पाटील, उदय सामंत यांची शिंदे-ठाकरे एकत्र येण्याची इच्छा आहे. त्यांना फार उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे. ही भूमिका जर आधी घेतली असती तर ही वेळ आली नसती. पक्षप्रमुखांचं नेतृत्व त्यांना मान्य असेल तर त्यांना आमचे नेहमीच दरवाजे उघडे आहेत, असं अहिर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *