मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प ; पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवण्याचं काम पूर्ण झालं असून अद्याप रेल्वे एक तास उशिरानं धावत आहे. लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली आहे. मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान ही घटना मध्यरात्री घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं. अप लाईनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळविण्यात आल्यानं रेल्वे सेवा सुरळीत सुरू होती. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. सध्या रेल्वे उशिरानं धावत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “आज 12 ऑगस्ट रोजी लोणावळ्या नजिक पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलं. बोल्डर आणि ओएचईचा खांब पडल्यानं मार्ग ठप्प झाला आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होतं. अथक परिश्रमानंतर दरड हटवण्यास यश आलं आहे. अप लाईनवर ही दरड कोसळल्यानं मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद होती. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *