महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । सलमान मुल्ला । कळंब । भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत. त्यामुळे स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उस्मानाबाद युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम यांनी मोफत फिजिओथेरेपी उपचार शिबीर आयोजीत केले आहे. हे शिबीर डॉ. संजित पाखरे यांच्या युनिक फिजिओथेरेपी क्लिनिक कळंब जि. उस्मानाबाद या ठिकाणी शनिवार दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे.
तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने *हर घर तिरंगा* या उपक्रमांतर्गत तिरंगा ध्वजदेखील वाटप करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम यांनी केले आहे.