व्यसन मुक्ती कार्यक्रमात शिक्षणमंत्र्यांचा तर्राट सल्ला ; दारूत नीट पाणी मिसळले तर ते औषध बनते

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । छत्तीसगडचे शिक्षणमंत्री प्रेमसाय सिंह टेकाम हे त्यांच्या वक्तव्यांमुळे वरचेवर चर्चेत असतात. मंत्रीमहोदयांनी दारूबाबत केलेली विधाने सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. टेकाम यांना छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील व्यसनमुक्ती कार्यक्रमात बोलावण्यात आलं होतं. 31 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात त्यांनी दारूबाबत त्यांचे विचार मांडले.

बलरामपूर इथे आयोजित करण्यात आलेल्या व्यसन मुक्ति कार्यक्रमात टेकाम यांना मुख्य पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी प्रख्यात कवी हरिवंशराय बच्चन यांनी मधुशाला ही कविता म्हणून दखवली. या कवितेतील ‘मस्जिद मन्दिर मेल कराती मधुशाला’ हे वाक्य म्हणत टेकाम यांनी सांगितलं की सगळ्या गोष्टी नियंत्रणात असायला हव्यात. दारूमध्ये जर पाणी मिसळून प्यायले तर ती औषधाप्रमाणे काम करते. टेकाम पुढे म्हणाले की, काहींच्या मते दारू हानिकारक आहे तर काहींच्या मते दारू ही फायदेशीर आहे. यानंतर टेकाम यांनी दारूसाठी ‘डी’ चे महत्व काय याचे रसभरीत वर्णन करून सांगितले. दारूत पाणी मिसळताना त्याचे ‘डायल्युशन’ किती असावे दारू पिण्याचा अवधी ‘ड्युरेशन’ किती असावे याला एक वेगळेच महत्व असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *