महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेचं वजन वाढलं आहे. भाजप नेत्यांची राज ठाकरे (raj thackery) यांच्या निवास्थानी ये जा वाढली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) शिवतीर्थावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. त्यामुळे उद्योजक आणि राजकीय नेते राज ठाकरे यांच्या निवास्थानी भेट देत आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. दुपारी 4 वाजेच्या सुमारास ते पोहोचणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची ही पहिली भेट असणार आहे. मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या निवास्थानी जात आहे.
त्याआधी भाजप नेत्यांची शिवतीर्थावर ये जा सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या भेटीनंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली. मात्र, चर्चेचा तपशील समोर येऊ शकला नाही. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘माझ्या सर्व कौटुंबिक कार्यक्रमाला राज ठाकरे येत असतात. त्यामुळे मी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. राज ठाकरे सुरूवातीपासूनच हिंदुत्वीचा विचार मांडला आहे. ते हिंदुत्वाचे रक्षक कार्यकर्ते आहेत. असे मी मानतो, असं बावनकुळे म्हणाले.
‘कोणत्या पक्षासोबत युती करायची आहे, याबद्दलचा निर्णय आमचे वरिष्ठ घेत असतात. अमित शहा, जे पी नडडा, देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतात. मी अध्यक्ष झाल्यानंतर सर्वांनाच भेटतो आहे. तसा आज भेटलो. ही राजकिय भेट नव्हती, त्यामुळे कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असंही बावनकुळे म्हणाले.