महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – नाशिक – विशेष प्रतिनिधी – मालेगाव शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या रविवारी (ता.३) सकाळी २७ रुग्णांची वाढ होत ३२४ झाली. १२८ स्वॅब तपासणी अहवालात ९१ निगेटिव्ह तर २७ पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. याव्यतिरिक्त १० बाधितांची दुसरी तपासणीही सकारात्मक आली.
शहरातील नवीन २७ रुग्ण आदर्श नगर, पुंडलिक नगर (सोयगाव), सटाणा नाका, जगताप गल्ली, हिम्मत नगर, पाट किनार संगमेश्वर, जमहूर रोड, नुरबाग, इस्लामपुरा, सर सय्यद नगर, हजारखोली यांसह एसआरपी संकुल, एसपी ऑफिस परिसरातील आहेत. प्रकाश हौसिंग सोसायटीतील नऊ महिन्यांची बालिका व मालेगाव कॅम्पातील पाच वर्षीय मुलीलाही कोरोनाची लागण झाली आहे.