पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार?, शहरातील ‘या’ भागांत जड वाहनांना बंदी, वेळापत्रक जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ ऑक्टोबर । दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतूक कोंडींच्या समस्येचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. ऐन दिवाळीत लोक खरेदीसाठी गर्दी करत असताना. पुण्यातले रस्ते चक्का जाम झाले होते. वाहतूक कोंडी होत असताना सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. पुढार्‍यांना आश्वासन देऊनही वाहतूक कोंडी सुटली नसताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर टीका ही होऊ लागली होती. यावर उपाय म्हणून आयुक्त गुप्ता यांनी वाहतुकीच्या काम काजवर करडी नजर ठेवण्यासाठी सायबर डिसीपी भाग्यश्री नवटके यांना अतिरिक्त पदभार दिला. मात्र त्यानंतर आता वाहतूक उपयुक्त राहुल श्रीरामे यांनी वाहतूक सोडवण्यासाठी हाल चाल सुरू केल्याचं दिसत आहे.

 

दिवाळी निमित्त होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, शहराच्या मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सकाळी ६ ते रात्री ११ या कालावधीत जड वाहनांना बंदी असणार आहे. जड वाहनांना बंदी असलेल्या पुण्यातील रस्त्यांची नाव पुढीलप्रमाणे आहेत.

शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता : खंडुजीबाबा चौक ते वनदेवी चौक,

पौड रस्ता: पौड फाटा ते चांदणी चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेश रस्ता, लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज, टिळक रस्ता, लालबहादूर शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, वीर संताजी घोरपडे पथ, बाजीराव रस्ता, पुरम चौक ते सिमला ऑफिस चौक,

कॅम्पातील आंबेडकर रस्ता सुभाषचंद्र बोस चौक ते आंबेडकर पुतळा, कॅम्प, महात्मा गांधी रस्ता : गोळीबार मैदान चौक ते आंबेडकर पुतळा, कॅम्प, इस्ट स्ट्रीट : खान्यामारुती चौक ते इंदिरा गांधी चौक, लष्कर,

सोलापूर रस्ता : भैराबा नाला चौक सारसबाग, नॉर्थ मेन रोड कोरेगाव पार्क ए वी मी फार्म चौक

सकाळी ६ ते १२ आणि दुपारी २ ते रात्री १० या कालावधीत बंद राहणारे रस्ते

सिंहगड रस्ता : सावरकर चौक ते वडगांव पूल, नेहरू रस्ता : कृष्णराव ढोले पाटील चौक सेव्हन लव्हज चौक ते मालधक्का चौक आणि लक्ष्मीनारायण रस्ता : व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक ते सावरकर चौक.

सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते रात्री १० या कालावधीत जड वाहनांना बंदी

सातारा रस्ता कात्रज चौक ते मार्केटयार्ड, नेहरू रस्ता : आईमाता चौक ते वखार महामंडळ चौक, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, गंगाधाम शत्रूंजय रस्ता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *