फक्त 20 मिनिटांत कोणतीही सायकल बनू शकते इलेक्ट्रिक गाडी; आनंद महिंद्रा गुंतवणूक करण्यासाठी तयार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ डिसेंबर। भारत हा स्टार्टअप्सच्या क्षेत्रात सातत्याने प्रगती करतो आहे. देशातील अनेक तरुणांच्या मनात अनेक नवनवीन बिझनेस साठी प्लॅनिंग सुरू आहे; टेक्नॉलॉजी आणि विज्ञानाच्या आधारावर आणि स्थानिक लोकांसाठीच्या सोयीनुसार अनेक कल्पना सध्या प्रत्यक्षात रूपांतरित करण्यासाठी सगळेच मेहनत घेता आहेत.

आपण भारतीय अनेकदा जुगाडी लोकं म्हणून एकमेकांना ओळखतो; या जुगडांमध्ये थोडीशी सर्जनशीलता आणि कसब लावून अनेक आविष्कार होता आहेत. असाच एक आविष्कार हरियाणातल्या गुरसौरभ यांनी तयार केला आहे.

त्यांच्या या आविष्कारानुसार आपण कोणत्याही सायकलला फक्त 20 मिनिटांमध्ये इलेक्ट्रिक बाईक मध्ये रुपांतरीत करू शकतो. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सीईओ आनंद महिंद्रा यांनाही त्यांच्या या शोधामुळे खूप आनंद झाला आणि त्यांनीही या शोधात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *