महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी; शेतमालाचे मोठं नुकसान; नवीन संकटाची भर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे- विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – आज सलग तिसऱ्या दिवशी मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने जारदार हजेरी लावली. सोसाटाच्या वाऱ्याने काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले. तर, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. आधीच कोरोना व्हायरसच्या या संकटात सापडलेला शेतकरी सावरला नसताना आता यामध्ये नवीन संकटाची भर पडलीय. आज पुणे, नांदेड, लातूर, रत्नागिरी, हिंगोली, औरंगाबादसह अनेक तालुक्यांमध्ये पाऊस बरसला. दरम्यान, आज सलग तिसऱ्यांदा पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चितेत वाढ झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भात तापमानाचा पारा वाढतचं चालला आहे. आजच्या पावसामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उकाड्याने हैराणा झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. यावेळी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वारा वाहत होता. या पावसामुळे वातावरण पसरलेल्या गारव्यामुळे सुखद वातावरण निर्माण झाला.

लातूर शहर आणि परिसरात पावसला सुरुवातीला हलक्या सरी बरसल्या. तिकडे हिंगोलीच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. नांदेड शहरात देखील हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. निलंगा शहरात वादली वाऱ्यासह तुफान पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे पोल तुटून पडले. परिणामी अनेक गावं अंधारात गेले.

हिंगोली जिल्ह्यात वसमत शहरासह तालुक्यातील काही भागात अवेळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे शेतातील जनावरांसाठी ठेवलेला चारा भिजून नुकसान झालंय. त्याच बरोबर हळद पीक झाकण्यासाठी देखील शेतकऱ्याची मोठी धावपळ झाली. तर पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्याने काही घरावरचे टिनचे पत्रे देखील उडाले आहेत. सकाळपासूनच ढगाळ वातावरन असून अजून काही भागात पाऊस पडेल असा अंदाज आहे.

रत्नागिरीत आज पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी चिपळूण‌, खेड परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. आज देखील सकाळपासून रत्नागिरीत पाऊस बरसतोय. रत्नागिरीतील अनेक भागांत हा पाऊस पडलाय. मान्सून आगमनाला आता काहीच दिवस शिल्लक असताना मान्सूनपूर्व पाऊस कोकणात दाखल झालाय. या पावसामुळे आंबा बागायतदारांची मात्र तारांबळ उडालीय. कारण आंबा पीक अंतिम टप्प्यात असताना पाऊस सुरु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *