Chinchwad Bypoll: चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना अजून ही आग्रही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ फेब्रुवारी । पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही निवडणुक बिनविरोध होणार नाही. असे स्पष्ट केलं आहे.

राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, या निवडणुकांसाठी भाजप आणि काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना अजून ही आग्रही आहे मात्र मविआ त्यावर निर्णय घेणार आहे.

कसब्याची जागा काँग्रेसने लढवावी हे ठरलं होतं त्या ठिकाणी त्यांनी उमेदवार दिला आहे. पार पडलेल्या शिक्षक-पदवीधर निवडणूकांमध्ये भाजपला समजलं आहे की महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे.

त्यामुळे भाजपला वाटत आहे की ही निवडणुक होवू नये आणि झाली तर वेगळा निकाल लागेल. जरी मुख्यमंत्र्यांनी आव्हान केले असेल, राज ठाकरे यांनी नेहमी प्रमाणे पत्र जरी लिहिलं असेल तरी ही या निवडणुका होतील. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *