महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ फेब्रुवारी । शिवसेना कुणाची? या प्रश्नाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीचा दुसरा दिवस आहे. शिवसेनेनं जोरदार युक्तिवाद केल्यानंतर आज शिंदे गट आपली बाजू मांडणार आहे. पहिल्या दिवशी कोर्टाने महत्त्वाचे मत नोंदवले आहे.
राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे नियमित सुनावणी सुरू झाली. यावेळी शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे. यावेळी साळवे यांनी नबाम रेबिया निकालाचा दाखला दिला. पण, कोर्टाने नबाम रबिया प्रकरणाचे परिणाम होणार नाही, असे स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्य घटनापीठाने व्यक्त केले आहे. आज दुसऱ्या दिवशी शिंदे गट काय युक्तिवाद करणार हे पाहण्याचे ठरणार आहे.